श्री शिवमहापुराण कथा नियोजन तयारी अंतिम टप्यात; वेळेत झाला हा बदल
लाल दिवा-नाशिक,२०: आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची वेळ दुपारी १ ते ४ होती त्यात बदल करण्यात आला असून दुपारी २ ते ५ या वेळात ही कथा होणार आहे. दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर रोजी भवानी माथा, सब स्टेशन जवळ, दोंदे मळा, पाथर्डी गाव, पाथर्डी, जाधव पेट्रोलपंप समोर, नाशिक येथे करण्यात आले आहे.
लाखोंच्या संख्येने शिवभक्त व भाविक या कार्यक्रमासाठी येणार असल्याचा अंदाज असून त्यानुसार सर्व नियोजन अंतिम टप्यात सुरू आहे.
- भाविकांना येण्यासाठी प्रवेशद्वार
विविध भागातून, गावातून येणाऱ्या भाविकांना कार्यक्रम स्थळाच्या मार्गांना प्रसिद्ध शिवशंकरांच्या नावांच्या प्रवेशद्वारांची उभारणी करण्यात आली असून भाविकांनी त्यानुसार येणे अपेक्षित आहे.
प्रवेशद्वार क्रमांक १ श्री त्रंबकेश्वर द्वार गजरा नंदनवन, अटलरी सेंटर – पाथर्डी रोड या प्रवेशद्वारा कडून सिन्नर,एकलहरा, नाशिकरोड, भगुर, देवळाली या भागातून येणाऱ्या भाविकांसाठी.
२. श्री संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज प्रवेशद्वार, जाधव पेट्रोल पंप समोर. पाथर्डी रोड या मार्गाने घोटी, इगतपुरी, मुंबई कडून येणाऱ्या भाविकांसाठी.
३. श्री भवानी माथा कपालेश्वर प्रवेशद्वार, इंदिरा नगर गुरू गोविंद सिंग रोड येथून सिडको, सातपूर, द्वारका, मुंबई नाका कडून येणाऱ्या भाविकांसाठी.
४. श्री निळकंठेश्वर प्रवेशद्वार इंदिरा नगर रोड कडून सिडको, सातपूर, गंगापूर रोड, पंचवटी कडून येणाऱ्या भाविकांसाठी.
५. श्री सोमेश्वर प्रवेशद्वार शरयू नगरी, कडून सटाणा, मालेगाव, धुळे या भागातून येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था केली आहे.
- पार्किंग
भाविकांसाठी प्रमुख रस्त्यांवर विविध ठिकाणी स्वतंत्र बस पार्किंग, कार पार्किंग, टु व्हिलर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी त्यानुसारच गाड्या पार्किंग कराव्या.
प्रमुख मुख्य रस्त्यांवर कुठे गाड्या पार्क करू नये.
- कथा मंडप
या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येणे अपेक्षित असून त्यासाठी तीन टप्यात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
- स्टेज
कार्यक्रमासाठी ८० बाय ४० चे भव्य स्टेज उभारण्यात आले असून. श्री त्रंबकेश्र्वरराज चा देखावा उभारण्यात आला असून, धनुष्यधारी प्रभू श्री रामाची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज व शिवलिंग उभारण्यात आले आहे.
- आसन व्यवस्था
श्री शिवमहापुरण कथा कार्यक्रमासाठी प्रामुख्याने अपंग, अंध, साधू संत, महिला, पुरुष, मीडियासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
- आरोग्य व्यवस्था
भाविकांसाठी सुसज्य स्वतंत्र आरोग्य व्यावस्थे अंतर्गत हॉस्पिटल, रिझर्व्ह बेड, लॅब, ई सी जी, ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची व्यवस्था करण्यात आली असून नाशिक शहरातील प्रमुख हॉस्पिटल मधील देखील काही बेड रिझर्व्ह ठेवण्यात आले आहे. तसेच रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
- प्लास्टिक बंदी
भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या प्लास्टिक मुळे सदर कार्यक्रम प्लास्टिक मुक्त करण्याचा आयोजकांचा मानस असून भाविकांनी शक्य तितके पाण्याच्या बाटल्या ह्या घरून आणाव्या असे आव्हान करण्यात आले आहे.
- स्टॉल
कार्यक्रम स्थळी बुक स्टॉल, पूजा साहित्य, धार्मिक ग्रंथ, नाष्टा सेंटर असे विविध स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.
- प्रमुख आकर्षण
श्री शिवमहापुराण कथा या कार्यक्रम स्थळी शिवशंकराचे ५५ फुटी उभे त्रिशूळ उभारण्यात येत असून शिवलिंगाची उभारणी नाशिकचे कलावंत करत आहेत.
तसेच नाशिक शहरातील हजारो नागरिकांनी स्वतःहून स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला असल्याची माहिती शिवमहापुराण कथा उत्सव सेवा आयोजन समितीच्या वतीने अजय बोरस्ते यांनी दिली. या प्रसंगी प्रवीण तिदमे, प्रशांत जाधव, रंजन ठाकरे उपस्थित होते.