जिल्हा मजूर संघाकडे दिवाळी सणासाठी बोनसची मागणी. सौ अनिता भामरे भाजप…!

लाल दिवा-नाशिक,ता.१०: जिल्हा मजूर सहकारी संघाकडे दिवाळी सणासाठी बोनसची मागणी भाजपच्या पदाधिकारी सौ अनिता भामरे यांनी चेअरमन प्रमोद भाबड यांच्याकडे केली आहे. 

    हिंदु धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी हा असतो. गेल्या काही वर्षांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्याच्या परिस्थितीत शासनाकडून मजूर संस्थेस कामे मिळत नाहीत. त्यामुळे मजूरांच्या कुटुंबांतील सदस्यांवर उपाशी राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दरवर्षी मजूर संस्थांना दप्तर लिहीणे व ऑडिट करणे यासाठी किमान रूपये दहा हजारांवर अधिक खर्च प्रत्येक संस्थेस येतो. 

   गेल्या वर्षी नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाकडे केवळ वर्गणीतून रूपये दोन कोटी बाहत्तर लाख जमा झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक मजूर सहकारी संस्थेस दिवाळीत बोनस म्हणून रूपये दहा हजाराची मागणी चेअरमन प्रमोद भाबड यांच्याकडे भाजपच्या पदाधिकारी सौ अनिता भामरे यांनी केली आहे.  

  •      दिवाळीसाठी बोनसच्या मागणीचे निवेदन मजूर सहकारी संघाचे सचिव सुनिल वारूंगसे यांच्याकडे देतांना भाजपच्या पदाधिकारी सौ अनिता भामरे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!