नाशिक जिल्ह्यात सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; मंत्री भुसे…!

लाल दिवा-नाशिक,या.८: नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करणेबाबत नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांना पत्र पाठवून नाशिक जिल्ह्याची सद्य स्थिती लक्षात आणून दिली आहे. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने गुरांना चारा , पाणी तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. याच पार्श्भूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर होवून मदत मिळावी असा आग्रह मंत्री भुसे यांनी शासन दरबारी मांडला आहे.

 

चालू वर्षी खरीप हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. रब्बी हगांमातही पाणी अभावी पुरेशा प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी नाशिक जिल्हयातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्यात येऊन शेतकऱ्याला आवश्यक ती मदत करण्यात यावी अशी विनंती मंत्री भुसे यांनी या पत्रात केली आहे.

राज्यात पाण्याची टंचाई आहे. पाणीसाठा देखील नैसर्गिक दृष्ट्या पुरेशा प्रमाणात नाही. सामान्य नागरिकांना तसेच पशुधनाला जिल्ह्यात याचा फटका बसत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी सरकारने दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश दुष्काळात करावा असे देखील मंत्री भुसे यांनी म्हटले आहे. 

 

31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला असून शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये, गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.” दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी भुसे यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!