शिवसेना उपनेत्यासह माजी शिक्षण उपसंचालकावर गुन्हा दाखल…!
लाल दिवा-नाशिक,या.५ : नाशिकरोड विभाग गुन्हयांचा तपशिल फिर्यादी :- सहायक संचालक लिंबाजी दौलतराव सोनवणे, वय 56, रा. शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक रोड, नाशिक. 9763714765
आरोपी :- 1) डॉ. अव्दय प्रशांत हिरे-पाटील, रा. मधुरमुरली, पंचायतसमिती समोर, मालेगांव कॅम्प, ता. मालेगांव, जि. नाशिक. 2) अशोक मुरलीधर बच्छाव, मयत, 3)रियाज अली आबीद अली जहागिरदार, रा. सर्वे नं. 477, हजार खोली, मालेगांव शहर, ता. मालेगांव, जि. नाशिक. 4) प्रसाद रमेश खैरनार, रा. वन्हानेपाडा, ता. मालेगांव, जि. नाशिक. 5) दिलीप सिताराम केसकर, रा. जळगांव निबांयती, ता. मालेगांव, जि. नाशिक. 6) श्रीराम भिमराव पवार, रा. श्रमीक मंगल कार्यालय, राहणे मळा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर. 7 ) सिध्दार्थ रमेश निकम, रा. प्लॉट क्र. 5, पॅराडाईज अर्पाटमेंट, गंगापुररोड, नाशिक. 8) केदा त्रंबक भदाणे, रा. अबोली कॉलनी, सुयोग मंगल कार्यालया समोर, मालेगांव कॅम्प, ता. मालेगांव, जि. नाशिक. 9) प्राजक्ता प्रकाश ठाकुर, रा. वीरसावरकर नगर, प्लॉट क्र. 15, लोटस हॉस्पीटलच्या मागे, चर्चगेटजवळ मालेगांव कॅम्प, नाशिक. 10) रामचंद्र ना. जाधव, रा. तत्कालीन शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक,आरोपीचा इतिहास :- माहीती उपलब्ध नाही दि. 15-06-2017 रोजी 00:00 वा. ते दि. 06-10-2023 रोजी 00:00 वा. शिक्षण उपसंचालक कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक ठिकाणी यातील आरोपीतांनी संगनमत करून श्रीम. प्राजक्ता प्रकाश ठाकुर यांच्या शिक्षणसेवक नियुक्तीच्या आदेशाची बनावट कागदपत्र तयार करून शासन निर्णय दि. 23-06-2017 नुसार खाजगी अनुदानीत शिक्षक भरती प्रक्रिया हि प्रवित्र प्रणालीद्वारे करणे आवश्यक असतांनाही परस्पर भरती करून बनावट व खोटया कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभुल करून शासकिय निधीचा अपहार केलेला आहे बाबत फिर्यादी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल.