मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप यांच्या आवाहनानंतर नेते व पदाधिकाऱ्यांचे उतरू लागले वाढदिवसाचे बॅनर ….!
लाल दिवा-नाशिक,दि.१ : मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आता समाज बांधवांची जोरदार वज्रमूठ तयार झालेली असतानाच अन्य समाजांच्या लोकांचाही या मागणीस मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी किती रास्त आहे. याची प्रचिती येते असे सकल मराठा समाजातर्फे सांगण्यात आले. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक तुषार जगताप यांच्या एका वादग्रस्त फेसबुक पोस्ट व आवाहनानंतर नेते व पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे बॅनर आता हळू हळू उतरू लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
वाढदिवसानिमित्त लावण्यात बॅनर्स उतरवून शिक्षणसम्राट आणि महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक सावंत यांनी समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला आहे. नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनीही मराठा समाजाच्या आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
अशोक सावंत यांचा बुधवारी वाढदिवस होता.त्यांच्या समर्थकांनी सिडको तसेच संपूर्ण महानगरात जोरदार बॅनरबाजी केली होती.मात्र जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू असल्याने आनंदोत्सवाचे बॅनर्स लागल्यास त्याचा वेगळा संदेश जाईल असे निदर्शनास आल्यानंतर सावंत यांनी तातडीने हे बॅनर्स उतरून मराठा समाजाच्या आंदोलन सक्रिय पाठिंबा दर्शविला.राकेश दोंदे यांनीही वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर्स हटवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे जोरदार समर्थन केले. प्रशांत दिवे यांनी संतोष साळवे यांनीही उपोषणात सहभाग नोंदवून समाजाच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले. कैलास मुदलियार, वाल्मीकि,मेघवाळ व मेहत्तर समाजाचे सुरेश मारू यांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे जोरदार समर्थन केले आहे. शीख धर्मियांच्या वतीने रम्मी राजपूत,सतनाम राजपूत यांनीही आरक्षण मागणीला पाठिंबा दर्शविला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष अंबादास खैरे यांनी स्वस्त डाळ वाटपाचा कार्यक्रम लांबणीवर टाकला व मराठा समाजाचा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका मांडली. नाशकात मराठा समाजाने शांततेत आंदोलन व उपोषण करून राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.जरांगे पाटील मराठा समाजाच्या हितासाठी झगडत असल्याने त्यांना खंबीरपणे साथ देणे हे सर्वांचे कर्तव्य असून हिंसक घटनांचा अवलंब करण्याचे सर्वांनी टाळावे असे आवाहनही सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले.
- ♦पाठिंबा वाखाण्याजोगा
नाशकात सकल मराठा समाजाच्या आवाहनास मिळत असलेला पाठिंबा वाखाणण्याजोगा आहे. मराठा समाजास पाठिंबा म्हणून नेते व पुढारी वाढदिवस,आनंदोत्सवासारख्या कार्यक्रमांना फाटा देत आहेत. वाढदिवसाचे बॅनर्स हटवित आहेत ही बाब स्तुत्यच म्हणावी लागेल.अन्य समाजाचा मराठा आरक्षणास मिळत असलेला पाठिंबा बघून मराठा समाजाची मागणी किती रास्त आहे याचीच साक्ष पटते. राजकीय नेतेमंडळी यांनी आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे राजकीय होल्डिंग, बॅनर थोडसं थांबावाव आंदोलन आक्रमक दिशेने जाऊ नये यासाठी आपलं सहकार्य मराठा समाजाला अपेक्षित आहे.