अपघातग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांस एक कोटी पाच लाखाचा धनादेश सुपूर्द
लाल दिवा-नाशिक,दि.२६ : कै.पोलीस नाईक बक्कल नंबर १७३० सचिन बाळासाहेब वाटाणे हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि कार्यरत असताना दिनांक ०८/०७/२०२३ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी यांच्या सॅलरी खात्यावर अक्सिस बँके कडुन अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १,०५,००,०००/- रुपये देण्यात येते.
अक्सिस बँकेतर्फे मयत कै. पोलीस नाईक सचिन वाटाणे यांच्या वरसदाराला १,०५,००,०००/-रुपये
आणि अक्सिस बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी ८,००,०००/-रुपये देखील आज देण्यात आली आहे . एकूण एक कोटी तेरा लाख रूपये देण्यात आले .विमा रक्कमेचा धनादेश
मा.पोलिस आयुक्त श्री अंकुश शिंदे सर यांच्या हस्ते त्यांचे वारसदार श्वेता सचिन वाटाणे यांना देण्यात आला.
सदर वेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे
आणि
अक्सिस बँकेचे क्लस्टर हेड (Vice president )श्री दिनेश निचीत सर
गंगापूर रोड च्या शाखाप्रमुख सौ राजश्री उदावंत आनंदवल्ली शाखेचे शाखाप्रमुख श्री संदीप क्षीरसागर असे हजर होते.