यशस्वी होण्यासाठी न्यूनगंड दूर ठेवा – पोलीस उपायुक्त चव्हाण. …!
लाल दिवा -नाशिक,दि.२५सिडको, ता. २६ : जगातील कोणतीही स्पर्धा असो यशस्वी व्यक्ति तोच बनतो जो आयुष्यात स्वतःला कमजोर समजत नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आयुष्यात न्यूनगंड हा नेहमी दूर ठेवा असे प्रतिपादन गरुड झेप अकॅडमी मध्ये आयोजित यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ.किरण कुमार चव्हाण यांनी केली.
गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करून आर्मी नेव्ही पोलीस दलात दाखल झालेले यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसारखा खडतर मार्ग तुम्ही आयुष्यात निवडला. हा निर्णय योग्य असून योग्य दिशा,योग्य मार्गदर्शन,योग्य नियोजन केले व मनात आपल्याला मिळणाऱ्या आशा बद्दल कोणताही संकोच न ठेवता तयारी करा. स्पर्धेत यश अपयश येत राहील. खचून जाऊ नका. जिद्दीने प्रयत्न करत रहा. यश हमखास मिळेल. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. एस. सोनवणे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन प्रा.गाढे यांनी केले. तर आभार एल. के. डोळस यांनी मानले.