खुटवड नगर येथे घरासमोरून स्कॉर्पिओची चोरी, खुटवड नगर पोलीस चौकीच्या मागे ५० मीटर अंतरावरची घटना, पोलीस मात्र झोपेतच,संपूर्ण चोरी सीसीटीव्हीत कैद. ..!

लाल दिवा -नाशिक,दि.१: खुटवड नगर पोलीस चौकीच्या मागे येथे घराच्या समोरून स्कॉर्पिओची चोरी होत असताना पोलीस झोपेतच होते. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या मागे ५० मीटर अंतरावर ही घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले असून अर्धा तास चाललेल्या चोरीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

   मागील अनेक दिवसांपासून अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढतच असून पोलीस यंत्रणा निष्क्रिय ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गुन्हेगारीच्या घटना कमी व्हाव्या म्हणून ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या असताना त्या बंद असतात किंवा पोलिसच नसल्याने धूळ खात पडल्या आहेत. खुटवड नगर पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला ५० मीटर अंतरावर विलास भैय्यासाहेब पाटील (६३) यांचा आदेश बंगला आहे. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ (एमएच १५ एच सी ६६४७) घराबाहेर लावली असताना २७ सप्टेंबर ला पहाटे ३.४५ ते ४.१५ च्या दरम्यान चारचाकी कार मध्ये आलेल्या तिघांनी स्कॉर्पिओ चोरून नेली. याबाबत पाटील यांनी तत्काळ पोलीस चौकीला जाऊन तक्रार केली. मात्र नेहमीप्रमाणे खुटवड नगर पोलीस झोपलेले होते तर चौकीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांनाच उद्धत वागणूक देत अंबड पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अंबड पोलीस स्टेशनलाही २ तास तक्रार घेण्यात आली नाही तर आम्ही तुमच्या गाड्या सांभाळायच्या का असा उलट प्रश्न विचारण्यात आला. पोलिसांना नागरीकांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसल्याने जेष्ठ नागरिक असलेल्या पाटील यांना याबाबत मनस्ताप सहन करावा लागला.

खुटवड नगर पोलीस व अंबड पोलीस यांच्या बेजबाबदारपणा व वागणुकीबाबत विलास पाटील हे पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहेत. याबाबत येथील माजी नगरसेवक तानाजी जायभावे व माजी नगरसेविका अलका आहिरे यांनी सुद्धा कार चोरीच्या ठिकाणी नागरिकांची भेट घेतली.

 

यावेळी त्यांनीसुद्धा पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

(फोटो – १) खुटवड नगर येथे स्कॉर्पिओ चोरताना सीसीटीव्हीत कैद झालेले चोर.

२) चोरीच्या घटनेनंतरही बंद पोलीस चौकी.)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!