भावी खासदार निवृत्ती अरिंगळे यांच्या बॅनरमुळे नाशिक शहरात चर्चेला उधाण ..!
लाल दिवा : नाशिकचे भावी खासदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते तसेच नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे यांचे नाशिक शहरात विविध ठिकाणी भावी खासदार म्हणून बॅनर मोठ्या प्रमाणात झळकल्या असून या बॅनरमुळे सर्वच राजकीय पक्षात व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला
लोकसभा निवडणूक होण्यास किमान सहा ते आठ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच विविध राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सध्या नाशिक शहराचे खा गेल्या नऊ वर्षापासून हेमंत गोडसे हे आहे. खासदार गोडसे शिवसेना भाजप युतीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर साडेतीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते राज्याचे मुख्यमंत्री बनले.
त्यामुळे शिवसेना व भाजपची युती संपुष्टात आली होती. दरम्यान गेल्यावर्षी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात झटका बसला व भाजपाचे राज्यसभेचे व विधान परिषदेचे उमेदवार बहुमत नसताना सुद्धा निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मते फुटली…..