खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीतास खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात
लाल दिवा – नाशिक,६ : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गंभीर | गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातुन मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या. आडगांव पोलीस स्टेशन कडीला गु.र.नं. १४९ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दि. १७/०५/२०२३ रोजी १२.२७ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी रविंद्र दिलीप गांगुर्डे हा गुन्हा घडल्या पासुन पसार झालेला होता.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक, नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना आरोपींचा कसोशीने शोध घेत होते. नमुद गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी रविंद्र दिलीप गांगुर्डे हा दि. ०५/०६/२०२३ रोजी नांदुर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथे येणार असल्याची पो. अंमलदार विठ्ठल चव्हाण यांना खात्रीशिर बातमी मिळाली होती.
मिळालेल्या बातमी प्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन पाहिजे आरोपी रविंद्र | दिलीप गांगुर्डे, वय ३५ वर्षे, व्यवसाय- पेंन्टींग कॉन्ट्रॅक्टर, रा. बिल्डींग नंबर २, रूम नंबर ६३, निलगीरी बाग, यश | लॉन्स समोर, औरंगाबाद रोड, नाशिक यास नांदुर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगांव पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.