खासगी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार तिकिट दर व भाडे आकारावे– प्रदिप शिंदे…..!
लाल दिवा – नाशिक, दि.19 मे ,2023
खासगी प्रवासी बस वाहन वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार तिकिट दर व भाडे आकारणी करावी, असे आवाहन नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, भाडे आकारणी बाबत 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.
शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने तिकिट दर व भाडे आकारणी केल्यास किंवा प्रवास करतांना येणाऱ्या अडचणींची तक्रार dycommr.emf2@gmail.com या ई-मेल आयडीवर प्रवाशांनी नोंदवावी. असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.