खरे असून खोटे भासवून लाच घेताना जिल्हा उपनिबंधक “सतीश खरे “रंगेहात अटक…!
लाल दिवा -नाशिक,१५ : तक्रारदार हे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये संचालक पदी कायदेशीर पद्धतीने वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावरवर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी यातील आलोसे क्रमांक 1 जिल्हा उपनिबंधक, सहकरी संस्था नाशिक
सतिश भाऊराव खरे (वय 57 ) यांनी स्वतः तसेच लोसे खाजगी इसम क्र 2 शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय 32 वर्षे धंदा वकील, खाजगी) यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस लाख रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कम आलोसे क्र 1 यांनी स्विकारण्याचे मान्य करून आलोसे क्र 1 यांनी त्यांचे राहते घरी तक्रारदार यांचे कडून तीस लाख रोख लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. संशयिताविरोधात विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली ASI सुकदेव मुरकुटे, पोना मनोज पाटील, पोना अजय गरुड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,