सरपंचांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ! निवेदन गंगा पाडळी ला जल जीवन मिशनचे कामात हलक्या गुणवत्तेचे पाईप
नाशिक लाल दिवा,ता.९
नाशिक तालुक्यातील गंगा पाडळी लाखलगाव या ग्रुप ग्रामपंचायतचे जल जीवन मिशनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र या कामांमध्ये ठेकेदार हलगर्जीकपणा करीत असून हलक्या प्रतीचे पाईप वापरण्यात आले आहेत म्हणून सरपंच आत्माराम दाते यांनी जलजीवन मिशन अंतर्गत भुयारी पाईपलाईन योजनेचे काम गुणवत्ता नियंत्रण नाही म्हणून बंद पाडले. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांना सरपंचाने लेखी तक्रार केली आहे.
गंगा पाडळी नाशिक तालुक्यात हे गाव नदीकिनारी वसलेले असून सध्या गावांमध्ये जमिनीतून पाण्याची जोडणी सुरू आहे. यात वापरले जाणारे हलक्या प्रतीचे पाईप असल्याने या गावचे प्रभारी सरपंच आत्माराम दाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या हलक्या कामाची तक्रार केली आहे. हे पाईप हलक्या प्रतीचे असून ऑर्डर मध्ये दिल्याप्रमाणे विशिष्ट जाडीचे पाईप नाही म्हणून सरपंच आत्माराम दाते यांनी सदरील काम बंद पाडले आहे.
प्रतिक्रिया.
कामात ठरवून दिलेले पाईप वापरण्यात आले नाही म्हणून मी तक्रार केली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुणवत्ता तपासावी आणि योग्य तो न्याय निवाडा करावा. हे काम कायमस्वरूपी शाश्वत चिरकाल टिकून राहावे यासाठी आमचा प्रयत्न आहे कामात हलगर्जीपणा चालणार नाही.
– आत्माराम दाते,
सरपंच गंगा पाडळी, लाखलगाव ग्रुप ग्रामपंचायत नाशिक.