इयत्ता दहावीतील २००१ ची बॅच भेटली तब्बल २१ वर्षानंतर ; निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले !
लाल दिवा, ता. ५ : तब्बल २१ वर्षानंतर इयत्ता दहावीच्या वर्गातील मित्र मैत्रिणी व शिक्षक एकत्र भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळला. हसत खेळत सरते शेवटी समारोपप्रसंगी सर्वांचे डोळे पाणावले. उपस्थितनाही गहिवरून आले.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
त्यामध्ये शिक्षक वृंद ए खोडगे ,पी बी गायकवाड, इ झेड माळी, श्री. भांबरे, , एन व्ही देशमुख, ए. डी. सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी ,देविदास बाविस्कर ,नामदेव बागुल ,किशोर शितोळे, विजय देशमुख ,शरद देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना टकले आणि सुनील राठोड यांनी केले. तर प्रस्तावना अतुल शेलार यांनी केली. कार्यक्रमांमध्ये शिक्षक वृंदांना विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी ची मूर्ती भेट दिली. शाळेला कपाट भेट देण्यात आले .कार्यक्रमांमध्ये शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरते शेवटी सुभाष अहिरे यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मोलाची भूमिका ठरली ती ज्ञानेश्वर पाटील, महेश चोरमले, रवी कुमार कासार, विलास घिसाडी ,गणेश मोरे ,विलास दंडगव्हाळ ,प्रमोद ठोके अंबादास गुंजाळ, चंदन निकम, भूषण काटकर, विशाल उगले, ज्ञानेश्वर राठोड, कल्पेश राठोड, अनिल चव्हाण, दिपक आगवणे, सुषमा सोनवणे, हेमलता भांबरे, मोहिनी निकम यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
स्नेहसंमेलनामध्ये विशेष बाब म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी एक ठराव एकमताने संमत केला. तो म्हणजे दरवर्षी शाळेसाठी करू काहीतरी हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी मिळून काही निधी एकत्र करायचा आणि त्याचा सदुपयोग शाळेच्या विकासासाठी करायचा. या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक शिक्षक रुंद यांनी केले.