सकल हिंदू समाजाचे “गोरक्षक” गजू घोडके यांच्यामुळे मिळाले असंख्य “उंटांना” जीवनदान
लाल दिवा, ता. ४ : तपोवन परिसरामध्ये कुपोषित अवस्थेत असलेल्या असंख्य उंटांना सकल हिंदू समाजाचे गोरक्षक गजू घोडके यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनदान दिल्याने शहरातील प्राणी मित्रांनी त्यांच्या या जागृत भूमिकेबद्दल अभिनंदन केले आहे.
तपोवन परिसरामध्ये कुपोषित अवस्थेत असलेले असंख्य उंट अन्न व पाण्याविना तडफडून मारत असल्याची खबर हिंदू सकल समाजाचे गोरक्षक गजू घोडके यांना मिळताच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन उंटाची पाहणी करत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सादर खबर दिली.
त्यानुसार सदर उंटांना जीवे मारण्याचा उद्देश होता का ? असा संशय व्यक्त करून या सर्व मुलांना प्राणी मित्रांच्या सहकार्याने पांजरापोळ येथील निसर्गरम्य वातावरणात सोडण्यात आले.
तपोवन ते अंबड येथील पांजरापोळ पर्यंत असंख्य उंटांना बघून अनेकांना आश्चर्य वाटले.
या कुपोषित उंटांना जीवनदान दिल्याबद्दल असंख्य प्राणी मित्रांनी गजू घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. तपोवनात दोन उंट अन्न पाण्याविना मेल्याची माहिती घोडके दिली आहे. याबद्दल पोलीस प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने योग्य ती चौकशी करून या उंटांबाबत संबंधित व्यक्ती नेमके काय करणार होते. याचा तपास घेऊन कारवाई करावी अशी मागणी गजू घोडके यांनी केली आहे.