देवळाली कॅम्प पोलीसांची उत्तुंग कामगिरी चोरीच्या ९ मोटार सायकली शोधुन काढल्या !
लाल दिवा, ता. २ : पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आयुक्तालय हद्दीत घडणाऱ्या चोरी मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे संबधांने वेळोवेळी आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-२), अंबादास भुसारे, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुंदन जाधव व इतर अधिकारी / अंमलदार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते.
दिनांक २५.०४.२०१३ रोजी भगूर येथे गुन्हे शोध पथकाचे पोहवा ६५६ सिध्दपुरे, पोना १७६५ बलकवडे, पोशि २१८२ कोकणे पेट्रोलींग गस्त करीत असतांना पोहवा ६५६ सिध्दपुरे यांना भगूर गावात एक इसम चोरीची मोटार सायकल घेवून संशयीतरित्या फिरत आहे. त्यावरून त्यास अहुजा कॉम्प्लेक्स येथे साफळा रचून ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारता किरण राजु गांगुर्डे वय १९ वर्षे, धंदा मजुरी रा.वरचे चिंचोळे गाव, अंबड, नाशिक असे सांगितले त्याकडे विनानंबरची स्प्लेंडर मोटार सायकल असल्याने त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास देवळाली कॅम्प पोलीस ठाणेकडील गु.र.नं. ३१ / २०२३ भा. दं.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयात ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयात अधिक चौकशी करता त्याने व त्याचे साथीदाराने अंबड, दत्तनगर परिसरात मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी किरण राजु गांगुर्डे यास अधिक विचारणा करता, त्याने त्याचे साथीदार १) गौरव गणेश लहामटे वय २४ वर्षे रा. टाकेद बटुक, ता. इगतपुरी व २) गणेश आनंद गुप्ता रा. खालचे चुंचाळे, अंबड नाशिक अशी नावे सांगीतली. नमुद तौन्ही आरोपीतांकडे सखोल चौकशी करता, त्यांनी नाशिक शहर व ग्रामिण हद्दीतून एकूण ०९ मोटार सायकली व ०३ रेसर सायकली असा एकुण रुपये १,७४,०००/- किंमतीचा मुद्देमाल चोरला असल्याचे सांगीतल्याने सदरचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोना १७६५ बलकवडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ना. श्री. अंकुश शिंदे सो., पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे आदेशाने व मा.श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ – २), मा. श्री. अंबादास भुसारे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुंदन जाधव, सपोनि प्रकाश गिते, पोउनि श्री. संदेश पाडवी, पोउनि श्री लियाकत पठाण यांचे सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार पोहवा रमाकांत सिध्दपुरे, पोहवा सुनिल जगदाळे, पोहवा शाम कोटने, पोना राहुल बलकवडे, पोना सुभाष जाधव, पोना नितीन करवंदे, पोशि विजय कोकणे, पोशि एकनाथ बागुल, पोशि दिपक जठार यांनी केली आहे. सदर कामगिरीबाबत मा. वरिष्ठांनी देवळाली कॅम्प पोलीसांचे कौतुक केले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या मोटार सायकलीचे वर्णन
१) १५,०००/ रु. कि. धी. एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. काळे रंगाची त्यावर राखाडी पट्टा असलेली तिचा
सीन नं. MBLHA10EJ996121 व इंजीन नं. HA10EA99E2298. २१५,०००/-रूकि.ची. एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. काळे रंगाची त्यावर निळा गुलाबी रंगाचा पट्टा
असलेली तिचा चेसीज नं. 05H16C00478 व इंजीन नं. 05H15M00355.
३)१५,०००/रु कि. एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो. सा. काळे रंगाची त्यावर निळा पांढरे रंगाचा पट्टा
असलेली तिचा चेसीज. नं. MBLHA10EJ9HJ 29534 व इंजीन नं. HA10EA9HJ80831. ४)१५,०००/रू कि. एक स्प्लेंडर मो.सा. काळे रंगाचीतिचा चेसीज नं. 05C16F07282व इंजीन नं. 05C15E04030.
५) २०,०००/कि.ची. एक बजाज डिस्कव्हर मो.सा. लाल रंगाची त्यावर पांढरे काळे रंगाचा पट्टा असलेली तिचा बेसीज नं. MD2DDDZZZNWJ74693 व इंजीन नं. DUMBPH43098.
६) १५,०००/रु कि. एक हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. काळे रंगाची त्यावर निळा लाले रंगाचा पट्टा असलेली तिचा चेसीज नं. 00M20CZ6726 व इंजीन नं. 00H18E04608.
७)२०,०००/रूकि.ची. एक हिरो होंडा पॅशन प्रो मो.सा. काळे रंगाची तिचा चेसीज नं. MBLHA10AWDHH78256 व इंजीन नं. HA10ENDHH03194.
८) २०,०००/रू कि. एक हिरो होंडा पेंशन प्लस लाल रंगाची त्यावावर काहे पांढरा पट्टा असलेली तिचा चेसीज नं. 07KOSC40743 व तिचा इंजीन नं. 07K05M48945
९)२५,०००/- एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. सिल्वर रंगाची निळा पट्टा असलेली तिचा चेसीज नं MBLHA10EJ9HJ10177 व इंजीन नं. HA10EAOHJ93287.
१०) ५,००० रू. कि.ची एक TORNADO कंपनीची लाल काळे रंगाची रेसर सायकल,
११) ५,०००/ रु कि.ची. एक CORRADO कंपनीची नाल कळे रंगाची रेसर सायकल.
१,७४,०००/ रु एकुण
१२४,०००// रू. कि.ची. एक HERO SPRINT कंपनीची पोपटी व काळे रंगाची रेसर सायकल,