राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

म्हसरूळ येथील ब्रह्माकुमारीच्या राजयोग सेवाकेंद्रात कार्यक्रम संपन्न !

लाल दिवा ,ता.२६: नाशिक प्रतिनिधी :-

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका,अखंड सेवेच्या व्रत्तस्थ,विश्वसेवा तसेच मनुष्य आत्म्यांचे जीवन परिवर्तन करण्याच्या विचाराने ईश्वरीय सेवेत समर्पित करणाऱ्या,विविध ठिकाणी आध्यात्मिक मेळ्यांचे आयोजन करून लाखोंच्या संख्येत जनतेला ईश्वरीय संदेश पोचवत व मार्गदर्शन करणाऱ्या कसेच समाजात मन:शांतीबरोबर नैतिक मूल्य रुजविण्याचे अर्धशतकाहून अधिक वर्षे कार्य करणाऱ्या,नाशिक जिल्ह्याच्या शांतीदूत प.पू.राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंतीदीदी यांचा ७७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.

        यावेळी मा.महापौर रंजना भानसी,मा.स्थायी समिती सभापती गणेश गीते,शालिनीताई पवार,सामाजिक कार्यकर्त्या सौ दिपाली गणेश गीते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमृताशेठ सांगळे,सागर कंट्रक्शन संचालक भास्करराव सोनवणे,सौ.बेबीताई सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते इंजि.प्रवीण जाधव,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बेणी,दै.गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत,उपसंपादक के.के. अहिरे,जागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद सानप,निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय बोडके,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त संगीता बाफना,वृंदावन नगर येथील संत गजानन महाराज मंदिर अध्यक्ष सुनील पाटील,भास्कर जाधव, दिलीप सोनार व स्नेहनगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.यावेळी दीदींच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी मयुरी जोरे यांना “कर्तुत्वान महिला पुरस्कारा”ने सन्मानित करण्यात आले. यावेळी दीदींच्या वाढदिवसानिमित्त मा. महापौर रंजना भानसी, अमृताशेठ सांगळे,प्रवीण जाधव,जिल्हा कृषी अधिकारी मयुरी जोरे,ब्रह्माकुमार रामनाथ भाई,राजन भाई यांनी मनोगत व्यक्त करत दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.नाशिकरोड येथील राजयोग सेवा केंद्राच्या शक्ती दीदी,राणेनगर येथील सेवा केंद्राच्या विनादिदी,गंगापूर रोड येथील सेवा केंद्राच्या मनीषादिदी,पंचवटी सेवा केंद्राच्या पुष्पादिदी,ब्रह्मकुमार रामनाथभाई,वसंत बाविस्कर,मोहन भाई राऊत, बाळासाहेब सोनवणेसर आदींसह शहरातील तसेच जिल्हाभरातील साधक सेवेकरी उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले.यावेळी पाहुण्यांचे स्वागत द्वारका राजयोग सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी ज्योती दीदी व आभारप्रदर्शन त्रंबकेश्वर सेवा केंद्राच्या मंगल दीदी यांनी केले.

 

*चौकट:-१)*👇

दीदींचा अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांच्या वाढदिवसानिमित्त “बाल निरीक्षण गृहा”तील मुला-मुलींना खाऊ व फळे वाटप करण्यात आले. दीदींनी यावेळी अनाथ मुलांबरोबर वाढदिवस साजरा होत असल्याचा आनंद व्यक्त करत मार्गदर्शन केले.याप्रसंगी बाल निरीक्षण गृहाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दैनिक भ्रमरचे संपादक आदरणीय चंदुलाल शहा, दैनिक गावकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. तसेच राजयोगिनी ब्रम्हाकुमारी शक्ती दिदी, राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुनम दीदी यांनी मुला मुलींना राजयोगाचे फायदे विशद केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे सर यांनी केले.यावेळी दैनिक भ्रमरचे कार्यकारी संपादक हितेश शहा उपस्थित होते.

 

*चौकट:-२)*👇

ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण 

      दिंडोरी रोडवरील स्नेहनगर येथील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर तसेच वृंदावन नगर येथील संत गजानन महाराज मंदीर येथे प ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वड,पिंपळ,कडूलिंब,औदुंबर, आंबा, आवळा,चिंच इत्यादी विविध वृक्षांचे दीदींच्या शुभहस्ते तसेच ब्रह्माकुमारी पूनम दीदी, सामाजिक कार्यकर्ते इंजि.प्रवीण जाधव,मोहन राऊतसर, बाळासाहेब सोनवणेसर,कापुरेभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत रोपण करण्यात आले.

   यावेळी स्नेहनगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिराचे सुहास कुलकर्णी, रवी बरके तसेच वृंदावन नगर येथील संत गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष सुनील पाटील,दिलीप सोनार, सतीश सनदे,भास्कर जाधव,अनिल राजवाडे, वडजे, प्रसाद मांडे,रविंद्र कदम, कैलास कदम, कैलास पाटील, अशोक काळोगे, राजीवभाई शिंदेभाई, सुनिता जाधव,अरुणा मोरे, मंगल दवंगे,लता सोनार, शोभा देवरे,निर्मला खैरनार,सरिता म्हसदे, वंदना कदम, नलगेमाता,भदाणेमाता, प्रतिभा माता आदिसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!