कायद्याच्या कठोरतेसोबतच कर्तव्याची कोमलताही! नाशिक पोलिसांचा आदर्शवत उपक्रम
श्री. कर्णिक यांनी स्वतः हातभार लावल्याने पोलिसांमध्येही उत्साह संचारला. त्यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी आहे.” *समाजसेवक
लाल दिवा-नाशिक:* गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर राहणारे नाशिक शहर पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत नाशिक शहर पोलिसांनी स्वच्छतेचा धडाका लावत कर्तव्याची एक वेगळीच बाजू दाखवून दिली. दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत शहर पोलिसांनी आयुक्तालय, पोलीस ठाणे, पोलीस चौक्यांसह सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्वतः हातभार लावत पोलिसांना आदर्श घालून दिला.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांना पकडणे, वाहतूक नियंत्रण करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या पोलिसांनी स्वच्छतेच्या कार्यातही पुढाकार घेतल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या उपक्रमामुळे पोलिसांची जनतेशी असलेली दरी कमी होण्यास मदत होईल.
पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. झाडू, फावडे हातात घेत त्यांनी परिसर स्वच्छ केला. पोलिसांचे हे कर्तव्यदक्षते नागरिकांनाही प्रेरणा देणारे आहे.
या स्वच्छता मोहिमेमुळे पोलिसांचा जनमानसांतील आदर नक्कीच वाढेल. पोलिसांनी केलेले हे श्रमदान समाजासाठी एक आदर्शवत उदाहरण आहे. अशा उपक्रमांद्वारे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.