जीएसटी ऍमनेस्टी योजनेवर नाशकात भव्य मार्गदर्शन परिषद…

२९० हून अधिक व्यावसायिकांचा जीएसटी ऍमनेस्टी परिषदेला प्रतिसाद

लाल दिवा-नाशिक, ४ डिसेंबर: जीएसटी ऍमनेस्टी योजना (कलम १२८A) विषयी मार्गदर्शन करण्यासाठी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिक (TPAN), महाराष्ट्र राज्य जीएसटी विभाग आणि नाशिक शाखा ICAI यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉल येथे एका भव्य मार्गदर्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेस २९० हून अधिक सीए, कर सल्लागार, व्यापारी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाचे अप्पर राज्य कर आयुक्त श्री. राजेसाहेब माने होते, तर राज्य कर सहआयुक्त श्री. जितेंद्र पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. TPAN चे अध्यक्ष श्री. अक्षय सोनजे आणि नाशिक शाखा ICAI चे अध्यक्ष श्री. संजीवन तांबुळवडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि योजनेचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन TPAN चे सचिव अॅड. प्रकाश विसपुते यांनी केले. मान्यवरांचा परिचय सीए अभिजित मोदी यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन श्री. नितीन फिरोदिया यांनी केले. राज्य जीएसटी विभागाचे उपआयुक्त श्री. विनोद पाटील आणि स्वीय सहायक श्री. सागर शेवाळे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. राज्य जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

  • ऍमनेस्टी योजनेचे फायदे उलगडले

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते, की-नोट स्पीकर सीए प्रीतम महुरे यांचे सखोल मार्गदर्शन. कलम १२८A अंतर्गत ऍमनेस्टी योजनेचे फायदे उलगडून सांगताना त्यांनी थकीत करदात्यांना दंड व व्याजाच्या मर्यादेत मिळणाऱ्या सवलतींबद्दल सविस्तर माहिती दिली. यामुळे करदाते सोप्या पद्धतीने कर जबाबदारी पूर्ण करू शकतात आणि शासनाच्या महसूल वाढीला हातभार लावू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना महुरे यांनी योजनेच्या कार्यक्षमतेबद्दल सविस्तर माहिती दिली.

  • थकीत प्रकरणे निकाली काढण्याची सुवर्णसंधी

श्री. माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ऍमनेस्टी योजनेला थकीत प्रकरणे निकाली काढण्याची आणि दंड व व्याजामध्ये सवलत मिळवण्याची सुवर्णसंधी म्हटले. करदाते आणि करसल्लागारांनी या योजनेचा लाभ घेऊन विभाग आणि करदाते यांच्यातील संबंध अधिक सुलभ करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. पाटील यांनी ऍमनेस्टी योजनेला विभागाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीचा एक महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे म्हटले. करदाते आणि विभागाने परस्पर सहकार्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढून नवीन प्रकरणांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. कर सल्लागार आणि सीए नेहमीच विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी असतात, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

  • यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीए जितेंद्र फफाट, अॅड. निखिल देशमुख, श्री. मनोज धडीवाल आदींनी विशेष प्रयत्न केले. ज्येष्ठ सदस्य आणि माजी अध्यक्षांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. हा उपक्रम जीएसटी विभाग आणि व्यावसायिक संघटनांमधील सशक्त सहकार्याचे प्रतीक ठरला.

या योजनेमुळे थकीत प्रकरणे निकाली निघून राज्याच्या महसूल उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!