जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा फरार आरोपी गजाआड
गुंडगिरीला आला लगाम, फरार आरोपी सापळ्यात
लाल दिवा-नाशिक, २४ सप्टेंबर २०२४ – उपनगरात सिगारेटच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका पानवाल्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील फरार आरोपीला अखेर गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ओम खंडु चौधरी (१९, रा. कथडा, जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२४ सप्टेंबर रोजी हर्षल देवरे या पानवाल्यावर लखन काशिद, किश शिंदे आणि त्यांच्या ७-८ साथीदारांनी सिगारेटचे पैसे मागितल्यावरून प्राणघातक हल्ला केला होता. आरोपींनी देवरे यांना हॉकी स्टिक, लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने मारहाण केली होती. या हल्ल्यात देवरे गंभीर जखमी झाले होते. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली होती.
मात्र, ओम चौधरी हा आरोपी फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथक त्याचा शोध घेत होते. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पथकाला तो नानावली परिसरात असल्याचे समजले. ३ डिसेंबर रोजी गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून चौधरीला अटक केली.
गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव आणि सविता कवडे यांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.