महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात: २० नोव्हेंबर रोजी मतदान, यंत्रणा सज्ज, मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र पेटणार निवडणूक रिंगणात: २० नोव्हेंबरला मतदानाची ह्या गर्जना!

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२४ (वृत्त क्र. ५)**: भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून मतदारांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

श्री. चोक्कलिंगम आज येथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी आणि विजय राठोड उपस्थित होते.

  • महत्वाचे मुद्दे:

 

मतदार नोंदणीची मुदतवाढ: ज्या पात्र नागरिकांची अद्याप नोंदणी झालेली नाही त्यांच्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. ही नोंदणी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

मतदारांची संख्या: राज्यात सध्या एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये पुरुष मतदार ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२, महिला मतदार ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ आणि तृतीयपंथी मतदार ६ हजार ३१ इतके आहेत.

नवीन मतदार: १८-१९ वर्षे वयोगटातील २० लाख ९३ हजार २०६ नवीन मतदारांची नोंद झाली आहे.

मतदान केंद्र: २०१९ च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्या वाढवून १ लाख १८६ करण्यात आली आहे. यामध्ये ४२ हजार ६०४ शहरी आणि ५७ हजार ५८२ ग्रामीण मतदान केंद्रांचा समावेश आहे.

दिव्यांग मतदार: ६ लाख ३६ हजार २७८ दिव्यांग मतदारांची नोंद झाली असून त्यांच्यासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

आदर्श आचारसंहिता: निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक खर्च: प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मरयादा ४० लाख रुपये इतकी आहे.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट: राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

तक्रार निवारण: निवडणूक प्रक्रियेतील कोणत्याही तक्रारींसाठी १९५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री. चोक्कलिंगम यांनी सर्व राजकीय पक्षांना, उमेदवारांना आणि नागरिकांना निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती आणि इतर सूचना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या या https://ceo.maharashtra.gov.in

संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!