गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट: फिर्यादीच्या भूतकाळाचा शोध घेताच उलगडले धक्कादायक वास्तव! अनेक करनाम्याचा पर्दाफाश, अँड मनोज अहिरे यांच्याकडून भांडाफोड… परिसरात एकच खळबळ!
लाल दिवा नाशिक,दि.२८:-. ॲड. मनोज आहेर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला खुलासा पुढील प्रमाणे, स्वतःला वकील म्हणून मिरवणारे प्रशांत खंडेराव जाधव हे गोळीबार प्रकरणातील फिर्यादी आहेत. संशयित आरोपी अंकुश लक्ष्मण शेवाळे यांना दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयामध्ये पोलीस रिमांड करीता हजर केले असता, न्यायालयामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे विरुद्ध पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणी बाबत अंकुश याने तक्रार केल्या कारणाने न्यायालय आवरात प्रशांत जाधव यांनी जमवलेले गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या सहकार्याने अंकुश लक्ष्मण शेवाळे यांची बहिण सौ. स्नेहल किशोर पाटील हिला दबाव टाकण्याकरिता अश्लील शिवीगाळ करून तसेच अश्लील स्पर्श करत मारहाण केली असल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याबाबत अधिकची माहिती अशी की सदर प्रकरणात दिनांक १५-०९-२०२४ रोजी न्यायालयाने संशयित आरोपी अंकुश शेवाळे यांचे तक्रारी वरून मे. न्यायालयाने संबंधित पोलीस कर्मचारी पवन परदेशी आणि सचिन करंजे तसेच तपाशी अधिकारी यांचे विरुद्ध चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मात्र प्रशांत जाधव हा सराईत गुन्हेगार असून सदर पोलीस कर्मचारी व अधिकारी सोबत व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत.
१) गुन्हा क्रमांक ४८/ २०१९ देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये प्रशांत खंडेराव जाधव यास मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस ठेवण्यात आले होते. त्यासोबत गोळीबार प्रकरणातील श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या हा त्याच्यासोबत एका ठिकाणी सर्कल ५ मध्ये बंदिस्त होता. आरोपीला ओळखत असलेल्या प्रशांत खंडेराव जाधव यांनी २०२२ मधील गोळीबार प्रकरणात श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या यांना का? त्यावेळेस ओळखले नाही. यामध्ये संशय निर्माण होत आहे.
२) सन २०२३ मध्ये प्रशांत खंडेराव जाधव यांना वकिली व्यवसायाची सनद मिळवण्यासाठी चारित्र्य पडताळणीच्या नामनिर्देशन फॉर्ममध्ये गुन्हे बाबतची माहिती हेतू पुरस्कर लपवून, बेकायदेशीर वकिली व्यवसायाची सनद मिळवलेली आहे. त्यामुळे प्रशांत खंडेराव जाधव याची सनद रद्द करून त्याचे वरती गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. कुठल्या पोलीस स्टेशन मधुन त्यास NOC मिळवली आहे. त्याची सुद्धा चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे.
३) २४ मार्च २०१९ रोजी प्रशांत खंडेराव जाधव यांचेवर गुन्हा क्रमांक ४८/२०१९ अन्वये बेकायदेशीर कब्जा व खंडणीचा गुन्हा दाखल असतांना. पोलिसांची फसवणुक करून प्रशांत खंडेराव जाधव यांनी बंदुकीचा परवाना मिळवलेला आहे. प्रशांत खंडेराव जाधव यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. प्रशांत खंडेराव जाधव यांना बंदुकीचा परवाना मिळाल्या पासुन आज पावेतो बराच लोकांना त्यांचा धाक दाखवुन बळजबरीने खंडणी वसुल केल्याचे तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अपसंपदा मोठ्या प्रमाणात जमा केल्याचे दिसुन येत आहे.
४) दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल झालेल्या फिर्यादी अन्वये तत्कालीन तपासी अधिकारी श्रीकांत निंबाळकर यांनी प्रशांत जाधव यांचे सांगण्यावरून तब्बल शंभरहून अधिक संशयितांची चौकशी केलेली आहे. मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये संशयित आरोपी विरुद्ध पोलिसांच्या सांगण्यावरून अंकुश शेवाळे वरती गुन्हा दाखल केलेला आहे. यांचे अवलोकन केले असता फेब्रुवारी २०२२ मध्ये संबंधित शेकडो लोकांचे तपास का करावे लागले.? याबाबत कुठलेही स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेले नाही.
५) जानेवारी २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मा. पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक यांचे खोटे सही शिक्केनिशी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी संगणमत करून नवीन नाशिक परिसरातील सामाजिक, राजकीय आणि प्रतिष्ठित लोकांकडून ललित पाटील ड्रग्स प्रकरणात खोट्या नोटिसा देऊन खंडणी वसूल केल्याचे प्रकार घडलेलाआहे. त्याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी यांचे विरुद्ध तक्रार दिलेली आहे. त्यावर चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेले होते. त्यामध्ये तपासी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नजन यांच्याकडे तपास करण्यासाठी प्रकरण दिले होते. पोलीस चौकशी दरम्यान दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी स्वतःला २१ फेब्रुवारी रोजी गोळी झाडून अंबड पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या केली आहे. त्याबाबत चौकशी होणे गरजेचे होते. परंतु प्रशांत खंडेराव जाधव यांनी पोलीस कर्मचारी पवन परदेशी आणि त्यांचे इतर साथीदार यांना वाचवण्यासाठी अशोक नजन यांच्या वरती प्रशांत खंडेराव जाधव दबाव टाकल्यामुळे त्यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या
केली असल्याचे पोलीस तपासात येणे आवश्यक होते अद्याप ते आलेले नाही.
६) गोळीबार प्रकरणात प्रशांत खंडेराव जाधव यांच्या सांगण्यावरून २० हून अधिक मास व्यापारी यांच्यावर संशय निर्माण झाला होता. मुळात प्रशांत खंडेराव जाधव हा मास विक्रेत्याकडून वेळो-वेळी खंडणी घेत असल्यामुळे त्यांचेवर संशय निर्माण झाला होता. खंडणी वसूल केल्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याबाबत पोलिसात स्वतंत्र तक्रार केली जाणार आहे.
७) सन २०२२ मध्ये फिर्यादी प्रशांत खंडेराव जाधव यांच्या सांगण्यावरून संशयित युवती नामे मयुरी आणि तिच्या प्रियकरावर संशय निर्माण केला होता. प्रशांत खंडेराव जाधव यांनी मयुरी व तिचा प्रियकर आणि होणारा पती यांच्यावर संशय का घेतला.? याची चौकशी होणे गरजेचे आहे. झालेल्या लैंगीक अत्याचाराबद्दल चौकशी झाली पाहिजे.
८) एका पिडीत महिलेने आपल्या प्रियकरा विषयी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली परंतु गुन्हा गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असल्याने ३७६ अन्वये गुन्हा दाखल प्रकरणात प्रशांत खंडेराव जाधव व त्याचे सहकारी यांनी नवीन नाशिक मधील प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तींकडून वेळोवेळी खंडणीची मागणी करिता सदर महिलेचा वापर करून २५ लाख रुपयांची खंडणी वसूल केलेली आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्याकरिता प्रशांत खंडेराव जाधव व त्याचे सहकारी यांनी महिलेला प्रोत्साहित करून खंडणी घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवर दबाव आणला होता. त्याबाबत पिडीत महिलेने शहानिशा झाल्या नंतर खुलासा केलेला आहे. त्याचे तांत्रिक पुरावे आमच्याकडे आहेत. अशी माहिती एॲड. मनोज आहेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. परंतु या संदर्भात प्रशांत जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधितांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप असतील तर त्यांनी त्या संदर्भात कागदपत्र घेऊन पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.
## सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर बीफ प्रकरणी गंभीर आरोप, जाधव म्हणतात ‘मी निर्दोष’
**नाशिक** – नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर बीफ प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, जाधव यांनी सर्व आरोप फेटाळून लावत स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
प्रशांत जाधव यांच्यावर बीफ कांडात सहभागी असल्याचा आणि खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, जाधव यांनी या सर्व आरोपांना धाडसीपणे तोंड दिले आहे. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. बीफ कांडाशी आपला काहीही संबंध नसल्याचे आणि कोणाकडूनही खंडणी न घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत बोलताना जाधव म्हणाले की हा गुन्हा खोटा होता आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना या प्रकरणी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज देखील न्यायालयाने मंजूर केला.
“मी नाशिक मध्यवर्ती कारागृहात कुठल्याही गुन्ह्यात शिक्षा भोगलेली नाही,” असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
माध्यमांना उद्देशून बोलताना जाधव यांनी आपल्याविषयी चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचे म्हटले. आपली बाजू न ऐकता अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित केल्या जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“गोळीबार प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, कोणीही माझ्याविषयी काहीही सांगू शकते, पण सत्य हेच आहे की मी निर्दोष आहे,” असा दावा जाधव यांनी केला आहे.
जाधव यांनी माध्यमांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा आणि आपली बाजू ऐकून घ्यावी. आपल्याकडे सर्व पुरावे असून सर्व कागदपत्रे दाखविण्यास आपण तयार असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.