राज्यात 690 अनधिकृत शाळा शासनाने २०० शाळा केल्या बंद !
लाल दिवा,ता.२२ : नाशिक
महाराष्ट्रात अनधिकृत शाळांचे पीक मोठ्या प्रमाणावर येत होते. या संदर्भात शासन स्तरावर अनेक लेखी तक्रारी दाखल झाल्या होत्या पालकांनी व आरटीआय कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत शाळा संदर्भात महाराष्ट्रात विविध विभागात लेखी तक्रारी केल्यामुळे शासनाने शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती या शाळा तपासणीत महाराष्ट्रात 690 अनाधिकृत शाळा आढळल्या असून त्यापैकी दोनशे शाळा शासनाने बंद केल्याचे शासनाने प्रसिद्ध केलेला आकडेवारीवरून लक्षात येते.
शाळा म्हणजे संस्काराचे मंदिर समजले जाते मात्र शाळा चालवणाऱ्या विविध कॉर्पोरेट संस्थांसह व्यावसायिक लोकांनी महाराष्ट्रात शाळांचे बाजारीकरण चालवले होते यामध्ये ज्यादा दराने फी आकारणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे शाळांमध्ये गणवेश शैक्षणिक साहित्य विकणे शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची मनमानी असे प्रकार घडत होते यामुळे शासन दरबारी अनेक तक्रारी दाखल झाल्या या तक्रारींची दखल घेऊन शासनाने शाळा तपासणी मोहीम हातात घेतली या शाळा तपासणी मोहिमेमध्ये अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक खुलासे बाहेर आले. अनेक शाळा शासनाची परवानगी न घेता चालवल्या जात आहेत अशा शाळांना शासनाने कायमस्वरूपी कुलूप लावण्याचे धोरण आखले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या आयुक्तांसह शिक्षण संचालकांनी विविध विभागातील शिक्षण उपसंचालकांना या शाळा बंद करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यासंबंधी पालकांनाही अनधिकृत शाळेसंदर्भात सजग केले जात आहे.
विभागनिहाय अनधिकृत शाळा –
मुंबई विभागात 517 अनाधिकृत शाळा असून शासनाने 88 शाळा बंद केले आहे पुणे विभागात 69 अनाधिकृत शाळा असून 32 शाळा शासनाने बंद केले आहेत लातूर विभागात १ अनधिकृत शाळा आहे . कोल्हापूरमध्ये 28 अनधिकृत शाळा असून 27 शाळा शासनाने बंद केले आहेत. नाशिक विभागात 27 अनाधिकृत शाळा असून १० शाळा शासनाने बंद केले आहेत. औरंगाबाद विभागात ६ अनधिकृत शाळा असून ६ शाळा शासनाने बंद केले आहेत नागपूर विभागात 40 अनधिकृत शाळा असून 35 अनधिकृत शाळा शासनाने बंद केले आहेत. अमरावती विभागात २ अधिकृत शाळा असून दोन्ही शाळा शासनाने बंद केले आहे महाराष्ट्रात एकूण 690 अनधिकृत शाळा असून २०० शाळा शासनाने बंद केल्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्रात म्हटले आहे.