बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणारा इसम ताब्यात…..गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी…!

लाल दिवा : पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, सिताराम कोल्हे, नाशिक शहर यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने मोहिम सुरू करण्यात आली आहे. गुन्हेशाखा, युनिट क्र.२ नाशिक शहर कडिल वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२ ने खालील प्रमाणे कारवाई केली आहे.

दि,१७ मार्च २०२४ रोजी पोलीस अंमलदार स्वप्नी जुंद्रे

यांना आकाश प्रल्हाद आव्हाड वय-१९ वर्षे, रा. गणेश चौक, मयुरीगार्डन मागे वॉचमनरूम, सिडको, नाशिक हा त्याच्या कब्जात एक धारदार कोयता बाळगुन असल्याबाबत मिळालेल्या गोपनिय माहिती वरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, विशाल कुंवर, महेश खांडबहाले, तेजस मते यांनी गणेश चौक, मयुरीगार्डनच्या येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेवून त्यांचे कब्जातुन २५०/- रू किमतीचा एक धारदार कोयता जप्त केला असुन पुढील कारवाईकामी आकाश प्रल्हाद आव्हाड व जप्त मुद्देमाल अंबड पोलिस स्टेशन ला वर्ग केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!