कार चालकास गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्यास अटक गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी !
लाल दिवा, नाशिक:दि.०६/०५/२०२३ रोजी राहूल प्रसाद शिवनंदन प्रसाद वय २४ वर्ष रा. मुळ थाना बरकठठा, मु. तुईओ, पोस्ट कपका, जि. हजारीबाग, झारखंड. हल्ली रा. तीन हात नाका, ध्यान साधना कॉलेज जवळ, ठाणे. यांच्या ताब्यातील उबेर कंपणीच्या स्वीफ्ट कार मध्ये प्रवासी म्हणून एका अज्ञात इसमाने भाडे तत्वावर मुंबई येथून घेवून नाशिक येथे सोडण्यास सांगितले होते त्यानंतर सदर उबेर चालकास प्रवासी इसमाने कार चालकास नकळत पाण्यात गुंगीचे औषध | देवून ते पाणी पिल्याने फिर्यादीस गुंगी आलयानंतर फिर्यादीच्या खिशातील पैशाचे पाकीट व मोबाईल फोन चोरून पळून गेलयावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन कडील गुरनं. १६२ / २०२३ भादवि. कलम ३२८, ३७९ प्रमाणे दि.०८/०५/२०२३ रोजी अज्ञात आरोपी विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर अनोळखी इसमाचा शोध घेवून त्यांना अटक करणे बाबत मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. वसंत मोरे अश्यांनी गुन्हे शाखा युनिट क्र. १ व २ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्र. १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ व त्यांचे पथक असे
गुन्हा दाखल होताच घटनास्थळी भेट देवून त्या अनुषंगाने तात्काळ समांतर तपास करून आरोपी हा कोणत्या दिशेने गेला असे त्या अनुषंगाने तपास करून त्याभागातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून मानवी कौशल्याचा व तांत्रिक माहीतीच्या आधारे तसेच पोहवा ७१५ सुरेश निवृत्ती माळोदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत संशयीत इसम हा नाशिकरोड बस स्थानक येथे येत असल्याची माहीती मिळाल्याने त्यास सदर ठिकाणी गुन्हे शाखे कडील सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, सपोउपनि रविंद्र बागुल, पोहवा ७१५ सुरेश माळोदे, पोकॉ. २५४४ मुख्तार शेख अश्यांनी सापळा रचून लागलीच ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शुभम उर्फ स्वदेश दिपक नागपूरे वय २५ वर्ष हल्ली रा. जास्मीन सोसायटी, फ्लॅट नं. ००२, आसनगावं, ईस्ट, रहाटी, जि. ठाणे मुळ रा. ०३, साईदर्शन रो हाउस, श्री रामचंद्र नगर जवळ, एस्सार / नायरा पेट्रोलपंप मागे, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक. असे सांगून त्याची पंचासमक्ष पंचनाम्या अंतर्गत त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात गुन्हयात चोरलेला फिर्यादी यांचा मोबाईल मिळून आल्याने त्यास सदर मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्याने उपरोक्त नमुद गुन्हा केल्याची कबुली देवून फिर्यादीस गुंगीचे औषध देवून सदरचा मोबाईल चोरल्याची कबूली दिल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्हयाचे पुढील तपास कामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. अंकुश शिंदे मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे व. पो. निरी. श्री. विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, सपोउपनि रविंद्र बागुल, पोहवा ७१५ सुरेश माळोदे, पोकॉ. २५४४ मुख्तार