मनपाच्या १८ अधिकारी कर्मचा-यांचा सेवापूर्ती निमित्त प्रशासनामार्फत सत्कार !

लाल दिवा, ता. २८ : नाशिक महानगरपालिकेच्या दोन उपअभियंत्यांसह विविध विभागातील १८ कर्मचारी ३०एप्रिल २०२३अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील सभागृहात त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. नगर सचिव मदन हरीश्चंद्र, मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ झाला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगर नियोजन विभागातील उप अभियंता उद्धव गांगुर्डे यांनी कार्यकाळातील कामांना उजाळा देताना राजीव गांधी भवन निर्माण होत असतानाच्या आठवणी सांगितल्या. बांधकाम सुरु असताना सुपरव्हिजन केल्याचे सांगितले. यावेळी निवृत्त कमचा-यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. उप अभियंता उद्धव गांगुर्डे, मलनिस्सारण विभागातील उप अभियंता राजेश शिंदे, नाट्यगृह सुपरवायझर बाळासाहेब गिते, नाट्यगृह ऑपरेटर सुनिल कळसकर, घरपट्टी विभागातील लिपीक बापु भोज, वाहनचालक गोरखनाथ केदार, स्टाफ नर्स ऍलिस कदम, पंप ऑपरेटर राजेंद्र शिरसाठ, पेंटर निवृत्ती खैरनार, स्वच्छता मुकादम अंजना बर्वे, स्वच्छता मुकादम सचिन परमार, सफाई कामगार कुणाल रोकडे, शकुंतला कल्याणी, नरेंद्र गायकवाड, सुगंधा माळेकर, राजेंद्र गलांडे, शिला शिंदे आदी कर्मचारी निवृत्त झाले आहेत. 

सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचा-यांना कामगार कल्याण निधीतून प्रत्येकी 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. कामगार कल्याण विभागातील महेश आटवणे, आनंद भालेराव, राजश्री जैन, आरती मारु, मयुर चारोसकर, रमेश पागे आदी कर्मचा-यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!