14000 गरोदर महिलांची यशस्वी प्रस्तुती करून अनोख्या पद्धतीने मातृ शक्तीला वंदन केले ; मातृदिनानिमित्त मातृ शक्तीला वंदन….!
लाल दिवा -नाशिक,ता.१४: मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून सर्वदूर साजरा केला जातो. मातृदिनाच्या निमित्ताने मातांसाठी कृतज्ञता, प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी सर्वजण घेत असतात. एसएमबीटी हॉस्पिटलनेदेखील गेल्या दहा वर्षांत हजारो गरोदर मातांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे. मागील दहा वर्षात हाॅस्पिटलने चौदा हजार गरोदर महिलांची यशस्वी प्रसूती करुन अनोख्या पध्दतीने मातृ शक्तिला वंदन केले.
याठिकाणी सिजेरीयन शस्रक्रिया तसेच नॉर्मल डिलिव्हरी पूर्णपणे मोफत करण्यात येत असून दर महिन्याला शेकडो महिलांवर या शस्रक्रिया अगदी मोफत केल्या जात आहेत. स्रीरोग विभागात गेल्या दहा वर्षात १४ हजार पेक्षा अधिक गरोदर मातांनी गोंडस बाळांना जन्म दिला आहे. दिवसेंदिवस येथील गरोदर महिलांचा आकडा वाढत असून अनेक क्लिष्ट शस्रक्रियादेखील येथे शक्य झाल्या आहेत. याठिकाणी अद्ययावत असे ऑपरेशन थियेटर साकारण्यात आले असून २४ तास याठिकाणी तज्ञ डॉक्टर सेवा बजावत आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावेत असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहेत.येथील अद्ययावत सुविधा आणि अनुभवी तज्ञांच्या उपलब्धतेमुळे येथील रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून राज्यभरातील रुग्णांचा ओघ आता एसएमबीटीकडे येऊ लागला आहे. विशेष म्हणजे, गरोदर मातांशी सलंन्ग्नित असलेल्या मातांची सोनोग्राफी व रक्त तपासणीच्या सर्व चाचण्यादेखील मोफत केल्या जात आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. तसेच जे आजार योजनेत बसत नाहीत अशा आजारांवर अगदी नाममात्र दरांत उपचार होत आहेत.
करोनाकाळात सर्वाधिक प्रसूती
करोना प्रादुर्भावाच्या काळात गरोदर मातांच्या सर्वाधिक डिलिव्हरी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये झाल्या. अनेक मातांना करोनासंसर्ग झालेला असतानाही याठिकाणी त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या. करोनासंसर्ग झालेल्या महिलांच्या उपचारासाठी याठिकाणी विशेष कोविड दक्षता विभाग उभारण्यात आला होता. यातून अनेक महिलांवर निशुल्क उपचार करण्यात आले होते.
प्रतिक्रिया
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये २४ तास अनुभवी स्रीरोग तज्ञ उपलब्ध आहेत. गर्भसंस्कारदेखील याठिकाणी केले जातात. अतिशय अवघड परिस्थितीत आलेलाही रुग्ण याठिकाणी येऊन बरा झालेला आहे. त्यामुळे येथील अनुभवी व तज्ञ डॉक्टरांची टीम प्रचंड मेहनत घेत असून जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
-डॉ. अमित नाईक, स्रीरोग तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल