उपनगर पोलीसांनी जळगाव येथे जावुन आरोपीता कडुन केल्या १० मोटार सायकल जप्त..!

लाल दिवा -नाशिक : दिनांक ०४/०७/२०२३ रोजी रात्री ११:०० वा. सुमारास पेंढारकर कॉलनी, महाजन हॉस्पिटल मागे जेलरोड नाशिक रोड, नाशिक याठिकाणी फिर्यादी यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा नं. एम. एच. १५ सी. वाय १५२९ हीराखाडी रंगावी मोटार सायकल लावलेली असतांना आरोपीतांनी सदरची गाडी चोरून नेले बाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे तकार प्राप्त झाली. सदर बाबत माहिती प्राप्त होताव घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस आयुक्त सो श्री अंकुश शिंदे सो यांच्या मार्गदर्शननानुसार मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग श्री. आंगदा वाघ सो यांनी उपनगर पोलीस ठाणे पोलीस पथकास आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या, तसेच उपनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकास खाना केले.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय पगारे व पोनि / बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि चौधरी व अंमलदार पोहवा विनोद लखन, पोना सोमनाथ गुंड, पोशि पंकज कर्पे, पोशि गौरव गवळी, पोशि अनिल शिंदे पोशि जयंत शिंदे, पोशि राहुल जगताप, पोशि सुरज गवळी, पोशि सौरभ लोंढे, पोशि संदेश रघतवान असे दोन वेगवेगळ्या गटात पोलीस पथक संशयित आरोपीचा शोध घेण्यास रवाना झाले. पोशि जयंत शिंदे व गौरव गवळी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व तांत्रिक विश्लेषणच्या संशयित आरोपींची माहिती मिळवली. सदर आरोपी हे जळगाव येथील असल्याची खात्री झाल्याने गुप्त बातमी दारांच्या मदतीने प्रमाणे गुन्हे शोध | पथकाचे अधिकारी सपोनि /सचिन चौधरी, पोशि/ सुरज गवळी, पोशि/जयंत शिंदे हे जळगाव येथे खात्री करणे कामी पोहोचले. जळगाव शहरात सुप्रिम कॉलनी, एमआयडीसी येथे त्यांनी आरोपींचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने अभिलेखावरील आरोपींबाबत माहिती घेवून सपोनि / सविन चौधरी, पोशि/सुरज गवळी, पोशि/ जयंत शिंदे यांनी आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण १० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीकडून ताब्यात घेवुन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांची नावे. १) अजय शंकर चव्हाण, वय-२९, व्यवसाय- बिगारी काम, रा. मच्छी बाजार, नवनाथ नगर, सुप्रिम कॉलनी, एम आय डी सी जळगाव.

२) उत्तम प्रेमा पवार, वय-३२, व्यवसाय-चालक, रा. प्लॉट नंबर १४७, बुद्ध विहारच्या जवळ, सुप्रिम कॉलनी, एम आय डी सी जळगाव. सदर आरोपींकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी ०४ अॅक्टीवा, ०४ हिरो होंडा

 

शाईन, ०१ हॉडा स्प्लेंडर, ०१ एच एफ डिलक्स.

 

9) MH-15 CY-1529 2) MH-15 GC-81353) MH-41 AD-83278) MH-19 CD-2599

 

५) MH-19 CG-8732 ६ ) MH-19 CH-5004७) MH-03 BR-1412 ) MH-20DP-3641 9) MP-68 MF-7570 90) MH-19 DM-0543 एकूण ४,७०,००० रु मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउनि / गोसावी व

 

मदतीनीस राहुल जाधव हे करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!