गोवंश जनावराची कत्तल करून मांसची विक्री करीता वाहतुक करणारे इसम जेरबंद……..गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरची कामगिरी……!
लाल दिवा : मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक/विक्री करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिल्या होत्या.
त्या अंनुषगाने दि. २८/०१/२०२४ रोजी युनिट क. १, नाशिक शहर कडील पोअं/२५४४ मुक्तार शेख तसेच पोअं १४०५ आप्पा पानवळ यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संगमनेर येथुन एक इसम गोवंश जनावंराची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याकरीता त्याचे महिंद्रा पिकअप गाडीतुन मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील खोडेनगर येथे विक्री करीता येणार आहे. त्यावर आज पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/चेतन श्रीवंत, पोना/१७९४ मिलींदसिंग पदरेशी, पोअं/२५४४ मुक्तार शेख, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२४५० राजेश राठोड, पोअं/२५१२ नितीन जगताप, पोअं/२२६० जगेश्वर बोरसे, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, चासपोउनि / किरण शिरसाठ अशा पथकाने खोडेनगर येथे सापळा लावुन महीन्द्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम.एच.१४ डी.एम. ३००६ या पिकअपमधील इसम नामे १) अमीर असद कुरेशी वय २७ वर्ष रा. संगमनेर, जि. अहमदनगर. २) सलमान इक्बाल कुरेशी वय २८ वर्ष रा. चौकमंडई भद्रकाली नाशिक यांना खोडेनगर येथे ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे ताब्यातील महिंद्रा पिकअप मध्ये गोवंश जनावरांचे सुमारे ५०० किलोच्या वर मांस मिळाले. तात्काळ पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावुन मांस चेक करून ताब्यात घेतले. इसम क्रमांक १ हा सदरचे मांस इसम क्रमांक २ याचेकडे आणुन देत व इसम कमांक २ हा मुंबईनाका, भद्रकाली, वडाळागाव येथील किरकोळ मटन विक्री दुकानात देई व दुकानात सदर मांस चोरून विक्री होत होते असे निष्पन्न झाले. त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण ८, ७५,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन दोन्ही इसमांविरूध्द प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ अ, ९ व ११ अन्वये मुंबईनाका पोलीस ठाणेस फिर्याद देवून त्यांना मुद्देमालासह मुंबईनाका पोलीस ठाणेचे ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोउनि/चेतन श्रीवंत, पोना/१७९४ मिलींदसिंग पदरेशी, पोअं / मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, विलास चारोरकर, चासपोउनि/किरण शिरसाठ अशांनी केलेली आहे.